
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रितपणे तपोवन मैदानाची पाहणी केली.यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply