सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ मालिका घेणार वेगळे वळण

 

सोनी सबवरील ‘ध्रुव तारा’ ही एक सुंदर प्रेमकथा आहे, जी २१ व्या शतकातील ध्रुव (ईशान धवन) आणि १७ व्या शतकातील ताराप्रिया (रिया शर्मा) यांच्यातील विलक्षण प्रेम दर्शवते. या मालिकेचे आकर्षक कथानक, मंत्रमुग्ध करणारा साऊंडट्रॅक आणि ध्रुव व तारा यांच्यात फुलणारा रोमान्स यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.
ताराने आपल्या भावाच्या म्हणजे महावीरच्या (कृष्णा भारद्वाज) शस्त्रक्रियेत आपल्याला मदत करावी असा आग्रह करणारा ध्रुव प्रेक्षकांना आगामी भागांत दिसेल. तर, तारा ‘हे पाऊल उचलावे का’ या दुविधेत दिसेल. घटनांच्या नाट्यमय वळणावर, ताराला आपली मदतनीस बनवण्यावरून ध्रुव राज सभेसमोर वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. एकंदरित, त्या दोघांच्या अडचणीत भर पडणार आहे, कारण राज सभेतील सर्वजण या कल्पनेला विरोध करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!