जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण

 

कोल्‍हापूर : ५० व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर(गोकुळ) व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्स (इंडिया) कोल्हापूर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या गोकुळ शिरगांव येथील प्रधान कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपन कार्यक्रम संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरर्सचे पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि ५ जून जागतिक पर्यावरण  दिवस हा पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त व्यक्तींना त्यांच्या कृतीतून पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्याचे आवाहन केले जाते . या वर्षी हा दिवस प्लास्टिक प्रदूषणावरील उपाय या विषयावर साजरा करण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे वातावरणात अनियमितता आली आहे. याचा परीणाम मानवी जीवनावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे अनेक घटक असून त्यामध्ये महत्त्वाचा घटक प्लास्टिक आहे. प्लास्टिकचा वापर अति प्रमाणात झाल्यामुळे पर्यावरण प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा वापर कमी करणे, प्लास्टिकच्या वस्तूच्या ऐवजी इको फ्रेंडली वस्तूंचा आपल्या दैनदिन जीवनामध्ये वापर करणे फार महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!