
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज आय.पी.एस अधिकारी मा.श्री.दीपक पांडे यांनी भेट दिली. या वेळी गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते दीपक पांडे यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी बोलताना दीपक पांडे म्हणाले कि देशाच्या कृषी क्षेत्रास दिशा देण्याचे काम सहकाराने केले आहे.महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रा च्या सहकार क्षेत्रात गोकुळ चे नाव आदर्शवत आहे. गोकुळ सारख्या शेतकरी भिमुख असणाऱ्या संस्थेस भेट देण्याचा योग आला. गोकुळ परिवाराच्या वतीने सन्मान केले बद्दल आभार मानले.श्री पांडे म्हणाले गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील एक नामांकित ब्रँड असून तो बनायला अनेक घटकांचे योगदान असणार आहे. योग्य नियोजन,शासन यंत्रणेची मदत व संघानियमांची अमलबजावणी,तसेच दूध उत्पादक केंदबिंदू मानून होत असलेले दैनंदिन कामकाज यामुळेच गोकुळ दूध संघ सहकारातील आदर्श संस्था आहे.खास करून जनावारांच्या आरोग्य चांगले राहावे या साठी गोकुळ राबवत असलेली आयुर्वेदिक उपचार पध्दती बद्दल संमाधान व्यक्त केले.
Leave a Reply