
कोल्हापूर: सहकारी संस्था (दुग्ध)कोल्हापूर चे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांचा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्छा भेट दिलेबद्दल संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते, व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प येथे सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) प्रदीप मालगावे म्हणाले कि, गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळने आपल्या गुणवत्तेचा जोरावर पुणे,मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृंधिगत केला आहे. महाराष्ट्रातील इतर सहकारी संस्थांनी गोकुळच्या कामकाजाचा आदर्श घेण्यासारखे आहे. गोकुळ ला सकारात्मक कामासाठी नेहमीच सहकार्य राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी गोकुळच्या तज्ञ संचालकपदी निवड झालेबद्दल राजेंद्र कृष्णाजी मोरे ,कुंभी कासारी बँकेच्या चेअरमनपदी संघाचे संचालक अजित शशिकांत नरके यांची निवड झालेबद्द्ल ,तसेच रयत सेवा सहकारी कृषी उद्योग संघाच्या चेअरमनपदी सचिन विश्वासराव पाटील यांची निवड झालेबद्दल व भैरवनाथ दुध संस्था राशिवडे खुर्द येथील विनायक तावडे यांचा आदर्श युवा दुध उत्पादक म्हणून गोकुळ परिवारा मार्फत सत्कार करण्यात आला .यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना केंद्रबिंदू मानून संघाचे कामकाज चालते. संघाबद्दल असणारी दूध उत्पादक शेतकऱ्यांची आस्था हीच गोकुळच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे व संघाचे दैनंदिन कामकाज कशा प्रकारे चालते याची सविस्तर माहिती दिली. यावेळी अजित नरके ,सचिन पाटील ,राजेंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केली.
Leave a Reply