युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. हे वर्ष भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून, तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरून वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे असून, देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने मैत्री दिनानिमित्त “राजेश युथ फेस्टिव्हल” चे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!