
मुंबई: गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कोल्हापूर जिल्हयातील लाखो जनावरांना संघामार्फत मोफत व अल्प दराने औषधोपचार केले जातात. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी आजार वाढत असून जनावरे बाधीत होत आहेत व त्यामुळे दूध उत्पादनाचे प्रमाण घटत आहे. गोकुळ दूध संघामार्फत बाधीत जनावरांवर उपचार चालू असून त्यासाठी शासनाकडून मदत मिळावी.तसेच गोकुळच्या विस्तारीकरण व दूधभुकटी निर्यातीबाबतचे प्रलंबित अनुदान मिळणेबाबत, पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोलॅसीसवरील २८ टक्के जीएसटी रद्द करावा, संघास भोकरपाडा औद्योगिक वसाहत जि.रायगड येथील भूखंड मिळणे, व संघाच्या प्रलंबित असणा-या विविध प्रस्तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्या मागण्याचे मुख्यमंञी यांचेकडे निवेदन दिले.यावेळी सदरचे सर्व प्रलंबित प्रस्तावाची माहिती संबधित विभागाकडून घेऊन ते मंजुर करण्याचे आश्वासन दिले. व पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि गोकुळ हि कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असुन जिल्हातील शेतकऱ्यांची दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचे काम गोकुळने केले आहे. तसेच दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळने भविष्या राज्याबाहेरही व्याप्ती वाढवावी व दुग्ध व्यवसायाचा विकास करण्यासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन करून व शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील,प्रवीण डोंगळे उपस्थित होते.
Leave a Reply