
कोल्हापूर:भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती सुरू केली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा सक्षम व्हावा हा दृष्टिकोन ठेवून विद्यापीठाने अंगीकारलेली शिक्षण प्रणाली ही प्रशंसनीय आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असलेली शैक्षणिक वाटचाल डी.वाय. पाटील विद्यापीठाने यापूर्वीच सुरू केली असल्याचे गौरवोद्गार डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी काढले.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या स्थापना दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कामत बोलत होते. यावेळी स्त्री शिक्षणासाठी अविरत योगदान देणारे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील याना डॉ. डी. वाय पाटील जीवनगौरव पुरस्कारने गौरविण्यात आले. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, सर्वोत्तम कर्मचारी, सर्वोत्कृष्ट प्राध्यापक आदींचा सत्कार करण्यात आला. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. क्रांतीकुमार पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तत्पूर्वी विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व ध्वजगीत झाले.कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांनी विद्यापीठाने गेल्या १७ वर्षात केलेल्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा मांडला. पहिल्या एकशे पन्नासमध्ये विद्यापीठाचा समावेश ही गौरवशाली गोष्ट आहे. विविध विषयावरील संशोधन, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती आदींची माहिती त्यांनी दिली.
Leave a Reply