
कोल्हापूर: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारी दैनंदिन विमानसेवा असावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल होते. त्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर – मुंबई मार्गावर रोज विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीकडून आज त्याबद्दलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बेंगलोरहून कोल्हापूरकडे विमान उड्डाण घेईल आणि १० वाजून २० मिनिटांनी हे विमान कोल्हापूरला येईल. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून निघालेले विमान, मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान कोल्हापुरात ४ वाजून ४० मिनिटांनी पोचेल. कोल्हापूर – मुंबई मार्गावर दैनंदिन विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशिल होते. त्याला आता यश आले आहे. रोज सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूरहून मुंबईला विमानाचे उड्डाण होईल. ११ वाजून ५० मिनिटांनी हे विमान मुंबईला पोचेल. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी विमान उड्डाण घेईल. ४ वाजून ४० मिनिटांनी विमान कोल्हापुरात येईल आणि तेच विमान ५ वाजून १० मिनिटांनी बेंगलोरला रवाना होईल. दैनंदिन विमानसेवा सुरू झाल्यामुळे, कोल्हापूरच्या उद्योग पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
Leave a Reply