महिलांनी सर्वप्रथम स्वतःचा सन्मान करावा : आमदार जयश्री जाधव

 

कोल्हापूर : प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवले पाहिजे. तिच्या प्रत्येक कार्याचे माहेर आणी सासरकडून कौतुक केले पाहिजे. मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रोत्साहन मिळाले तरच त्या यशस्वी होतील. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी इतरांकडून मिळणारा मान-अपमानापलीकडे जाऊन, महिलांनी सर्वप्रथम स्वतःचा सन्मान करावा असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित सेल्फी विथ बाप्पा व गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. माजी उपमहापौर विक्रम जरग व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मीता सत्यजित जाधव प्रमुख उपस्थित होते.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, सुसंस्कृत, सजग व सात्त्विक समाज निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. फाउंडेशनच्या विविध स्पर्धा, प्रशिक्षण व उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद अभिमानास्पद आहे. या उपक्रमातून फाउंडेशनने महिलांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित सर्वच उपक्रम हे येणाऱ्या पिढ्यांना सकारात्मक दिशा देणारे असल्याचे माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी सांगितले.स्पर्धेतील विजेत्यांना आमदार जयश्री जाधव, माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!