आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने ‘ नवरात्रोत्सव’निमीत्त विविध होम आणि पूजा विधी

 

कोल्हापूर: गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंग दर वर्षी प्रमाणे या वर्षी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ मध्ये श्री. चंडी होम सह विविध होम आणि पूजा विधी करत आहेत. दि.२०,२१ आणि २२ ऑक्टोंबर या दिवसात सकाळी ७.३० वाजल्यापासून हे विधी होत आहेत. रविवार दि.२२ ऑक्टोंबर रोजी सकाळी श्री. महा चंडी होम होणार आहे. हे सर्व विधी आयर्विन मेमोरियल हॉल, गवत मंडई येथे होत आहेत.
शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर रोजी सकाळी श्री.महा गणेश होमाने सुरवात होईल. गणेश होमासोबत नवग्रह होम, वस्तू शांती होम होईल. सायंकाळी महा सुदर्शन होम होईल. या होमामध्ये साधक सुदर्शन क्रिया करून आपली साधना पक्व करतात. २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी महारुद्र होम होईल. सायंकाळी श्री. चंडी कलश स्थापना आणि पारायण होईल. चंडी होममध्ये १०८ कन्यांचे कुमारिका पूजन, बटू पूजन, दांपत्य पूजन, गो पूजा इत्यादी पूजा होतात.
हे होम आर्ट ऑफ लिविंग चे ज्येष्ठ स्वामी अद्वैतानंदजी यांच्या पावन सानिध्यात होत असून स्वामीजी २३ वर्षापासून गुरुदेवांच्या सानिध्यात असून ते ज्येष्ठ प्रशिक्षक आहेत. हे होम आणि विधी करण्यासाठी बेंगळूरू स्थित वेद विज्ञान महाविद्यापीठमधील प्रशिक्षित ज्येष्ठ पंडित कौशिकजी सह अन्य तीन पंडित येत आहेत.
या सर्व होमांची सांगता सत्संग आणि महाप्रसादाने होईल. दि.२० रोजी सायंकाळी युवकांसाठी ‘दांडिया आणि रास गरबा’ होत आहे, विविध कला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. श्री. चंडी होमाची सांगता महाप्रसादाने होईल. या सर्व होमांची फलिते वेगवेगळी आहेत. तसेच असे होम हवन आणि विधी यामधील हवन आणि मंत्रोच्चार यांच्यामुळे मानवी जीवनातील, मनातील ताण तणाव आणि नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते, सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी होण्यास मदत होते आणि उपस्थितांना गहऱ्या ध्यानाची अनुभूती येते.या होममध्ये सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, वारणा-कोडोली, पेठ वडगाव, मलकापूर आणि जिल्ह्यातील अन्य भागातील लोक सहभागी होत आहेत.हे सर्व होम सर्वांसाठी खुले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. अशी माहिती आवाहन राजश्री भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या होमाच्या आयोजनामध्ये सचिन पाटील, वैशाली शेडे, सचिन मुधाळे, अनिमा दहिभाते, अजय किल्लेदार, प्रवीण देशमुख, जगदीश कुडाळकर, विनायक मुरदंडे, राहुल नागवेकर, मंदिर चव्हाण, बिना जनवाडकर, हेमंत माळी, श्रद्धा लाड, अजिंक्य पाडगांवकर इत्यादी प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!