
कोल्हापूर: आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या आणि कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची निवडीच्या नियुक्तीची पत्रे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या शहर कार्यालयात नियुक्तीपत्रे देऊन पार पडला. यावेळी या सर्व राष्ट्रवादीच्या निष्ठावांत नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष व्ही .बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व जनसंपर्क मोहीमा राबवण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.यावेळी जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल घाडगे, सुनील देसाई, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, नितीन भाऊ पाटील, गणेश जाधव, गणपतराव बागडी, राजाराम पाटोळे, सरोजनी जाधव, फिरोज सरगुर, महादेव पाटील, बाबा जगताप, सादिक आत्तार, अंजली पोळ,नितीन मस्के, रियाज कागदी, नागेश फरांडे, फिरोज खान उस्ताद, सुमन वाडेकर,, रामराजे बदाले, रेहना नागरकट्टी, सलीम मुल्ला, अरुणा पाटील, राजेंद्र ओंकार, प्रकाश पांढरे, लहू शिंदे, सुवर्णा शिंदे,संदीप साळोखे, नागेश जाधव, दीपक लोहार यांच्यासह अनेक शेकडो कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
Leave a Reply