टीपीओ राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी. वाय.पी.च्या सुदर्शन सुतार यांची निवड

 

कोल्हापूर: महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेचे कॅम्पस टिपीओ श्री. सुदर्शन नारायण सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शैक्षणिक समूहाचे डीन व सेंट्रल प्लेसमेंट सेलचे डॉ. शितलकुमार आधार रवनदळे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ द ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सच्या केंद्रीय समिती विश्वस्तांची निवड प्रक्रिया आणि वार्षिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले डी. वाय पाटील ग्रुपचे कॅम्पस टीपीओ श्री. सुदर्शन सुतार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सुतार यांनी यापूर्वी संघटनेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलेले असून टीपीओचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच प्रशिक्षण, रोजगार मेळावे, दक्षिण महाराष्ट्रात संघटनेचे विविध कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.२०१८ मध्ये या संघटनेची स्थापना झाली असून राज्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांचे टीपीओ या संघटनेचे सभासद आहेत. इंजीनियरिंग, फार्मसी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, सायन्स मधील महाविद्यालये सलग्न असून गेल्या सहा वर्षापासून विद्यार्थाना रोजगारा बरोबरच प्रशिक्षण देणे आणि टीपीओचे प्रश्न आणि त्यांच्या समस्याचे निरसन संघटनेकडून केले जाते.या निवडीबद्दल श्री. सुदर्शन नारायण सुतार यांचे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते सुदर्शन सुतार यांचा या निवडीबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, डीन (स्टूडंट अफेअर) डॉ. राजेंद्र रायकर, टीपीओ मकरंद काइंगडे आदी उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!