गुजरी कॉर्नरच्या महेंद्र ज्वेलर्सचं स्टेशन रोडवरील भव्य सुवर्ण पेढीत स्थलांतर

 

कोल्हापूर : 1982 साली कोल्हापूरच्या गुजरी कॉर्नरला सुरू करण्यात आलेल्या देवीचंद सोनमलजी ओसवाल यांच्या महेंद्र ज्वेलर्सचं आता स्टेशन रोडवर गोकुळ हॉटेल समोरच्या भव्य अशा सुवर्ण पेढीत स्थलांतर होणार आहे. ओसवाल परिवाराचा आधार असलेल्या संघवी पोपटबाई सोनमल ओसवाल यांच्या शुभहस्ते ही सुवर्ण पेढी ग्राहकांच्या सेवेत शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी रुजू होणार आहे. यावेळी कोल्हापूरचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सुप्रसिद्ध उद्योगपती व घोडावत उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत, पुण्याचे उद्योगपती ओमप्रकाश रोका, तसेच महाराष्ट्र स्टेट सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष व उद्योगपती फतेहचंद शंका यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता उद्घाटन होणार आहे अशी माहिती महेंद्र ज्वेलर्सचे देवीचंद ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सुवर्णपेढीमध्ये खास महिलांना आवडतील असे सोन्या-चांदीच्या घडणावळीच्या कलाकुसरीच्या दागिन्यांसह रत्नजडित दागिनेसुद्धा उपलब्ध असणार आहेत. असेही ते म्हणाले. अगदी छोट्यांपासून वयोवृद्ध ग्राहकांना आकर्षित करणारे डिझाईन आणि शुद्धता असलेले दागिने म्हणजे फक्त महेंद्र ज्वेलर्सचे दागिने असा ग्राहकांना असलेला सार्थ विश्वास आजही आम्ही टिकवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
118 वर्षांपूर्वी राजस्थान येथून वरदाजी रत्नाजी ओसवाल कोल्हापुरात आले आणि त्यांच्याच या नावाने त्यांनी गुजरी कॉर्नरला सुवर्ण पेढी सुरू केली. त्यावेळी राजस्थानी समाजातील केवळ 5 व्यावसायिकांच्या सुवर्ण पेढ्या कोल्हापूरमध्ये अस्तित्वात होत्या.
वरदाजी रत्नाजी ओसवाल यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र सोनमलजी ओसवाल यांनी या सुवर्ण व्यवसायाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि हा व्यवसाय सुरू ठेवला. 1967 साली त्यांचे निधन झाले. त्यांची चारही मुले अल्पवयीन असल्याने त्यानंतर 10 वर्ष ही सुवर्णपेढी बंद राहिली. देविचंद, मंजुळा, चंद्रकांत भरत आणि महेंद्र या भावंडांना त्यांच्या आई संघवी पोपटबाई अतिशय कठीण प्रसंगात लहानाचे मोठे केले. वडिलोपार्जित व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे बाळकडू दिले. आणि देवीचंद ओसवाल यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी महेंद्रकुमार सुरेशकुमार या नावाची भागीदारी सुरू केली.5 वर्ष व्यवसाय भागीदारीत केला. आणि भावंडं मोठी झाल्यानंतर 1982 महेंद्र ज्वेलर्स या नावाने आपली स्वतःची सुवर्णपेढी गुजरी कॉर्नरला सुरू केली. व्यवहारातील पारदर्शकता, जिद्द, सचोटी, विश्वास आणि प्रामाणिकपणा या पंचसूत्रीला जोपासून कोल्हापूरच्या ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. अल्पावधीतच महेंद्र ज्वेलर्स या नावाने सुवर्णपेढीसारख्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. ग्राहकांच्या मागणीनुसार 1998 साली आपली दुसरी शाखा राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावर भव्य दिव्य दालनात महेंद्र ज्वेलर्स याच नावाने सुरू केली. त्यानंतर 2010 साली देवीचंद ओसवाल यांनी महेंद्र ज्वेलर्स या नावाने आपला स्वतंत्र व्यवसाय सुवर्णपेढीच्या रुपात सुरू केला. त्यांची ही सुवर्णपेढी व्यावसायिक स्पर्धेत गुणवत्ता आणि सुवर्ण कारागिरी मधील नाविन्याची झळाळी टिकवत राजू, मितेश या दोन्ही मुलांनी भरभराटीला आणली. 2014 सालात राजू ओसवाल यांनी महेंद्र ज्वेलर्स या नावाने मॅचेस्टर सिटी म्हणून ओळख असणाऱ्या इचलकरंजी येथेही व्यावसायिक मागणी ओळखून नवीन शाखा सुरू केली.
आता भाऊसिंगजी रोडवरील जुनी महेंद्र ज्वेलर्स ची सुवर्णपेढी ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि व्यवसायाच्या बदलामुळे 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेल समोर देखण्या आणि नाविन्याने सजलेल्या आणि महेंद्र ज्वेलर्सच्या देशभरातील प्रत्येक प्रांतातील दागिन्यांची परंपरा सांगणान्या सुवर्णपेढीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे, असेही देवीचंद ओसवाल यांनी सांगितले. आजपर्यंत ज्या कोल्हापूर आणि राज्यभरातील ग्राहकांच्या विश्वासावर आपण सुवर्ण व्यवसाय केला तोच विश्वास यापुढे सुद्धा नव्या पिढीच्या माध्यमातून वृद्धिंगत होईल अशी खात्री यावेळी महेंद्र ज्वेलर्सचे देवीचंद ओसवाल दिली. दहा हजार स्क्वेअर फुटच्या प्रशस्त दालनात ही सुवर्णपेढी सुरू होत आहे. महेंद्र ज्वेलर्सने कोल्हापूरकरांना पहिल्यांदा हॉलमार्क, चांदीमध्ये हॉलमार्क, कॅरेटोमीटर मशीन, इलेक्ट्रॉनिक काटे, एसी शोरूम अशा विविध सुविधांची ओळख करून दिली. तोच विश्वास संपादन करत या भव्य दालनामध्ये सोने, चांदी, हिरे, मोती, वेडिंग कलेक्शनसाठी वेगवेगळी दालने असणार आहेत. अशी वैशिष्ट्यपूर्ण सुवर्ण पेढी कोल्हापुरात पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. घडणावळीवर वीस टक्के सूट तसेच वाढदिवससाचे निमित्ताने दहा टक्के जादा सूट ग्राहकांना मिळणार आहे. म्हणूनच कोल्हापूरच्या ग्राहकांनी एकदा या नवीन सुवर्णपेढी ला जरूर भेट द्यावी असे आवाहन देवचंद ओसवाल यांनी केले. पत्रकार परिषदेला महेंद्र परमार, अजित करढोणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!