
कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सम्राटनगर येथील जिव्हेश्वर हॉलमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आईसाहेब श्रीमती प्रेमला पंडितराव जाधव, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे, शिवसेनेच्या स्मिता मांढरे, माजी नगरसेविका छाया पवार, गव्हर्मेंट बँकेच्या संचालिका मेघना पंधारे, वंदना दुधाने, डॉ. शैलेजा टोपकर, मधुलिका जगदाळे, स्वप्नाली जगोजे, साहिल भारती आदी उपस्थित होते.रास दांडियामध्ये युवती, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. नॉनस्टॉप म्युझिक, डीजे आणि दांडियाच्या तालावर सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. पारंपारिक वेशभूषेत महिला व युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.
Leave a Reply