
कोल्हापूर: कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांची प्रातिनिधीक शिखर संघटना असून गेल्या ४० वर्षांपासून व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करीत आहे.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा चौथा पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ४.३० वाजता, राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मुळे – सदस्य – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नवी दिल्ली हे उपस्थित राहणार असून ते “व्यापार, उद्योगाची नवी दिशा” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्रीमती जयश्री जाधव- आमदार- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, ललित गांधी- अध्यक्ष- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई व धैर्यशील पाटील- अध्यक्ष- दि ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व दि महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.उद्योग व व्यापार क्षेत्रातील सभासदांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी व शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यापारी – उद्योजकांना गौरवण्याची परंपरा २०१८ सालापासून कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार, कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार, कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार या नांवे पुरस्कार देवून सुरू केली आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती जतन करणेसाठी मागील वर्षीपासून कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार या नावांने पुरस्कार दिला जातो.
सन २०२२-२०२३ या वर्षाकरीता पुरस्कार निवड समितीने निवडलेल्या खालील उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामवंताना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये
१) कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- २०२३- श्री. किरण जयकुमार पाटील (घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि.)
२) कै. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार – २०२३- श्री. पद्माकर विनायक सप्रे (ट्रायो एंटरप्रायजेस)
३) कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार – २०२३- श्री. भालचंद्र शिवप्रसाद परदेशी (परदेशी आणि कंपनी)
४) कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उद्योग पुरस्कार- २०२३
५) श्री. मंगेश केशवराव पाटील (मौर्या इंडस्ट्रीज)
६) श्री. मयंक अलोक गुप्ता (लॅण्डक्राफ्ट अॅग्रो एलएलपी)
पत्रकार परिषदेस कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply