
कोल्हापूर: डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या संशोधकांनी मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण विकसित केले आहे. कर्करोगाच्या जलद निदानासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून भारतीय पेटंट कार्यालयाने ‘स्टेम सेल शोधण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर उपकरणे’ या संशोधानासाठी पेटंट जाहीर केले आहे. विद्यापिठाला मिळालेले हे दुसरे डिझाईन पेटंट असून एकूण २९ वे पेटंट आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फोर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजच्या , स्टेम सेल आणि रीजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि त्यांची पीएचडी विद्यार्थिनी ऋतुजा प्रशांत गंभीर यानी हे संशोधन केले आहे. या उपकरणाची तंत्रज्ञान तयारी पातळी 4 (TRL-4) म्हणजेच प्रयोगशाळा चाचणी यशस्वी झाली आहे. डॉ. अर्पिता पांडे -तिवारी म्हणाल्या, “हे उपकरण म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर आहे. हे लहान आकारचे व हाताळण्यास अतिशय सोपे आहे. हे इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियांद्वारे नमुन्यामध्ये उपस्थित असलेल्या स्टेम सेल्सचे प्रमाण शोधण्यासाठी आणि त्याचे मापन करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी या सेन्सरचा चांगला उपयोग होऊ शकतो.या संशोधनासाठी रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी या संशोधनाबद्दल डॉ डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि ऋतूजा गंभीर यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply