
क्रीडाई चे बांधकाम विषयक ‘दालन’प्रदर्शन फेब्रुवारीमध्ये
कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांची वाढती संख्या विचारात घेऊन तसेच सभासदांचे सध्या चालू असलेले प्रोजेक्ट पहाता यापुर्वी तीन वर्षानी घेतले जाणारे दालन दोन वर्षानी घेण्याचा निर्णय मॅनेजिंग कमिटीने घेतला आहे . क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू बांधकाम विषयक प्रदर्शन ‘ दालन हे प्रदर्शन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर दि. ९ ते १२ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान आयोजित केले आहे. तसेच या प्रदर्शनाला कोल्हापूर च्या आसपाच्या भागातील तसेच इंचलकरजी जयसिंगपूर, गडहिंग्लज, निपाणी ,त्याचबरोबर शेजारच्या बेळगांव, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयातुन जवळ जवळ ४ लाख नागरिक भेट देतील अशी अपेक्षा क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व दालन फेब्रुवारी २०२४ चे चेअरमन चेतन वसा यांनी व्यक्त केली. दालन विषयी माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी अध्यक्ष के. पी. खोत यांनी दालनच्या कमिटीच्या पदाधिकारी यांची नावे घोषित केली ती खालील प्रमाणे .
१. चेअरमन :- चेतन वसा
२. व्हा. चेअरमन :- प्रमोद साळुंखे
३. कन्व्हेनर :- अतुल पोवार
४. को कन्व्हेनर : लक्ष्मीकांत चौगुले
५. को कन्व्हेनर :- संदिप पवार
६. सचिव :-गणेश सावंत
७. सहसचिव :- संग्राम दळवी
८. खजिनदार :- श्रीधर कुलकर्णी
९. सहखजिनदार :- उदय निचिते
या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनविन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान, बांधकाम विषयक साहीत्य, सेवा, अर्थ सहाय्य योजना यांची माहिती मिळावी हा असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास या प्रदर्शनाचा मोठा हातभार लावणारा आहे. येणारे दालन २०२४ भव्य दिव्य करण्याचा निर्णय क्रिडाई मॅनेजिंग कमिटी व दालन कमिटीने घेतला असून या दालन मध्ये सर्वासाठी घर घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. येणा-या दालन फेब्रुवारी २०२४ मध्ये आमच्या बांधकाम सभासदांचे १०० स्टॉल असणार असून आपले विविध प्रोजेक्ट मांडणी करणार आहते, तसेच मटेरियल व वित्तीय संस्थाचे १०० स्टॉल असणार आहेत अशी माहीती क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत व दालन २०२४ चे चेअरमन चेतन वसा यांनी दिली. पत्रकार परिषदेस संदीप मिरजकर यांच्यासह क्रीडायचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply