
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या, जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थच्या संयुक्त विद्यमाने ९ ते २० वर्षे वयोगटांतील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये ५५० मुलींना मोफत लसीकरण करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून हे लसीकरण सुरू असून, आतापर्यंत 16०० मुलींनी याचा लाभ घेतला आहे. कॅन्सर प्रिव्हेन्शन असोसिएशन इंडिया, रिसर्च स्टडिज ओरिजिनल प्रोजेक्टस्चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नुपूर खरे यांच्या सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबिरा चे मुख्य डाॅ राधिका जोशी यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबीर घेण्यात येतात डॉ. राधिका जोशी, डॉ. नंदकुमार जोशी, , डॉ. प्रवीण नाईक, डॉ. आशा शितोळे, डॉ. उन्नती सबनीस, शोभा तावडे, डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते.
Leave a Reply