
कोल्हापूर : असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त संपर्क कार्यालयात आण्णांना अभिवादन करण्यात आले.शून्यातून विश्व निर्माण करणारे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारे मदतगार असे सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वमान्य नेतृत्व म्हणून कोल्हापूरचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) ओळख आहे. आज जयंती निमित्त संपर्क कार्यालयात आमदार जयश्री जाधव आणि काँग्रेसच्या औद्योगिक क्षेत्राचे प्रदेश सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अण्णाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज दिवसभर संपर्क कार्यालयात राजकीय, सामाजिक, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या सर्वांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.
Leave a Reply