
कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम झाले पाहिजे, यासाठी लवकरच पुरातत्त्व विभागाची बैठक घेणार आहे. परंतु सध्या सुरू असलेले काम उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण झालेच पाहिजे. कामांमध्ये नागरिक व पर्यटक यांच्या सोयीसुविधांचा व सुचनांचा विचार झाला पाहिजे अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासन व ठेकेदार यांना दिल्या.आमदार जयश्री जाधव यांनी आज रंकाळा तलावास भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.आमदार जाधव यांनी रंकाळा टॉवरच्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि हे काम पुन्हा गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार झाले पाहिजे अशी सूचना दिली.आमदार जाधव म्हणाल्या, रंकाळ्यावर फिरायला येणारा माणूस किंवा पर्यटक तलावातील पाण्याच्या सभोवती फिरणार आहे. असे असताना जावळच्या गणपती बाजूच्या रस्त्यालगत वॉकिंग ट्रॅक करण्याची गरजच काय होती. या वॉकिंग ट्रॅकमुळे त्या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येत असून वाहतूक वारंवार ठप्प होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे गरज नसलेल्या या वॉकिंग ट्रॅक बद्दल प्रशासनाने फेरविचार करावा.रंकाळा टॉवर जवळच्या खाऊ गल्लीचे तर काम त्वरित पूर्ण करावे तसेच याभागात असणारे शौचालय नागरिकांसाठी खुले करावे अशी सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिली.रंकाळाच्या सभोवतीच्या वॉकिंग ट्रॅकची रुंदी कमी का केली आहे असा प्रश्न करत, नागरिकांच्या मागणीनुसार ती रुंदी वाढवण्यात यावी अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.रंकाळा तलाव कोल्हापुरातील जनतेचे तसेच पर्यटकांच्या विरंगुळ्याचे व जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. ऐतिहासिक रंकाळ्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच सध्या सुरू असलेले काम उच्च दर्जाचे आणि गुणवत्ता पूर्ण झालेच पाहिजे. या कामाच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास हे काम स्वतः बंद पाडू असा इशाराही आमदार जाधव यांनी यावेळी दिला.यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विक्रम जरग, प्रताप जाधव, इंद्रजीत बोंद्रे, अजय इंगवले, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, प्रवीन लिमकर, पप्पू नलवडे, सुरज जाधव, रणजीत निकम, शहर अभियंता हर्षजीत घाटगे आदी उपस्थित होते.
Leave a Reply