
कोल्हापूर : सौंदत्ती यात्रेसाठी गोकुळ दुधाची उत्पादने मिळण्याची सोय कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचा प्रयत्न दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर रोजी मार्गशीष पौर्णिमेच्या कोल्हापूरवाशी यांची सौंदती यात्रा भरत आहे. येथून जाणाऱ्या भाविकांना विशेषता गाडी प्रमुखांना तेथे उत्तम प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता असते ती गैरसोय जिल्हा रेणुका भक्त संघटनेने दूर केली आहे.संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी गोकुळ संघाचे अध्यक्ष व मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील यांच्याशी चर्चा करून वरील यात्रेच्या कालावधीत दूध श्रीखंड आम्रखंड पनीर लस्सी वगैरे दुग्ध पदार्थ पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे येथून जाणाऱ्या सर्व भाविकांना याचा लाभ घेण्याचा आहे. शिष्ट मंडळात अध्यक्ष युवराज मोळे उपाध्यक्ष तानाजी चव्हाण संस्थापक अच्युत साळुंखे ,कार्याध्यक्ष अशोकराव जाधव चिटणीस सतीश डावरे,सर चिटणीस गजानन विभुते, सरदार जाधव, आनंदराव पाटील, मोहन साळोखे,दयानंद घबाडे ,चेतन पवळ सुशांत पाटील यांचा समावेश होता.
Leave a Reply