
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी पशुआहार व मिनरल मिक्श्चरचे महत्व या विषयावरती एक्झॉटिक बायोसोल्युशन,बेंगलोरचे डॉ. सत्यजित सतपथी यांचे व्याख्यान संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.सत्यजीत सतपथी म्हणाले कि दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचा संतुलित आहार फार महत्वाचा आहे. या व्यवसायात जास्तीत जास्त खर्च हा जनावरांच्या आहारावरती होतो. हा खर्च कमी होण्यासाठी तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, योग्य पालन पोषण, दूध देण्याची क्षमता वाढण्यासाठी व प्रजननासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे यासाठी दूध उत्पादकांनी जनावरांना दुधाच्या प्रमाणात पशुखाद्य व मिनरल मिक्श्चर वापर करणे गरजेचे आहे. जनावरांचा भाकडकाळ कमी करण्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य व मिनरल मिक्श्चर हे जनावरांना हे वरदानच आहे असे मनोगत व्यक्त केले. तसेच समुद्र वनस्पतीपासून बनवलेले पशुखाद्यपूरक गुणवंतापूर्ण महालक्ष्मी फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्श्चर का वापरावे याची सविस्तर माहिती याप्रसंगी दिली. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले गोकुळमार्फत दूध उत्पादकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. गोकुळने आहार संतुलन कार्यक्रम राबविला असून भविष्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी प्रत्येक आहार संतुलन कार्यक्रम स्वयंसेवकांची (एल.आर.पी.) आहे. दुग्ध व्यवसायातील पशु आहार शास्त्रातील नवीन नवीन संकल्पना आज दूध उत्पादकांनी अवलंबून याचा फायदा घ्यावा तसेच दूध उत्पादन वाढीवर भर द्यावा.
Leave a Reply