
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत केदारलिंग सहकारी दूध संस्था जठारवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के.डी.सी.सी. बँक, सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या २० म्हैशी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केल्या त्याचे जठरावाडी येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या जनावरांचे दूध उत्पादकांना वाटप करण्यात आले. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम गोकुळकडून दूध उत्पादक शेतक-यासाठी मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. या भावणेतून दूध उत्पादकांनी जातीवंत म्हैशी खरेदी केल्या असून यासाठी दूध उत्पादकांनकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तरी संघाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे.असे मनोगत व्यक्त केले.संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यू.व्ही.मोगले, सहा.व्यवस्थापक डॉ.प्रकाश दळवी, संकलन अधिकारी दिपक पाटील,विद्यानंद पाटील, केदारलिंग दूध संस्थेचे सुभाष खाडे, प्रकाश खाडे तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.
Leave a Reply