एमआयटी पुणेतर्फे १३वी ‘भारतीय छात्र संसद’१० ते १२ जानेवारी दरम्यान

 
कोल्हापूर: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसद दि.१० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजन केले आहे.
 महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.
 या संसदेचे उद्घाटन, दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. देशाची माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, यूके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघनाद देसाई, माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण मा. शरद पवार, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा.राम चरण हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता समारोप होईल. या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली गेली आहेत. संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
 राजकारणातील युवा नेतृत्व-वक्तृत्व किंवा वास्तव,
युगांतर – संक्रमणातील तरूण, लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत, आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती, डेटा, विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना दुविधा, आपण चंद्रावर उतरलो, पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत ?
याशिवाय विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले गेले आहे.राज्य सभेचे खासदार व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, अध्यात्मिक गुरू स्वामी मुकुंदानंद, प्रसिद्ध इतिहासकार आणि स्तंभलेखक डॉ.विक्रम संपत, राज्य सभा टिव्हीचे प्रमुख संपादक गुरूदिप सिंग सप्पल, उद्योजक रणवीर अल्लाबदिया, भारतीय मानवधिकार कार्यकर्ता डॉ.स्नेहल रशीद, कवी मनोज मुंतशीर,  राज्य सभेचे खासदार मनोज कुमार झा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य व अभिनेत्री खुशबू  सुंदर, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील आभा सिंग, डॉ.टेसी थॉमस आणि राज्य सभेच्या सदस्य डॉ.फौजिया खान यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर तीन दिवस चालणार्‍या या १३व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत.
जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.
छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.
२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग असून महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग असून भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग आहे.भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगचा सहभाग तसेच निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार होणार आहे.आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.अशी माहिती समन्वयक रवी पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी परिक्षा नियंत्रक डॉ. बी.एम.हिर्डेकर व रामहरी रुईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती साठीwww.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!