
मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नवी मुंबई वाशी शाखा येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळच्या वाशी शाखेकडील सुयोग्य नियोजन, कार्यक्षम व कुशल वितरण व्यवस्था यामुळे मुंबई शहर, उपनगरे,नवी मुंबई,ठाणे, पालघर, व रायगड जिल्ह्यामध्ये गोकुळ ब्रॅन्डच्या दुधाला दिवसेंदिवस ग्राहकांनकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संघाच्या सध्याच्या स्वमालकीच्या नवी मुंबई येथील दुग्धशाळेमध्ये मिल्क चिलिंग, पाश्चरायझेशनसाठी प्रतिदिन ४ लाख लिटर इतकी दूध हाताळणी क्षमतेची रेफ्रीजरेशन सिस्टिम कार्यरत आहे. परंतु सध्या प्रतिदिन ८ ते ९ लाख लिटर इतक्या दुधाचे हाताळणी होत आहे. त्यामुळे रेफ्रीजरेशन सिस्टिमची क्षमता कमी पडत असून रेफ्रीजरेशन सिस्टीम अधिक सक्षम होण्यासाठी रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन फॉलिंग फिल्म चिलर प्लांट बसवण्यात आला आहे. या चिलर प्लांटमुळे दूध पिशवीचे तापमान पूर्वी पेक्षा 2°C कमी मिळणार आहे. त्यामुळे दुधाची गुणवत्ता अधिक काळ टिकून राहण्यासाठी निश्चीतच मदत होणार आहे. सदर प्रोजेक्टसाठी १.६ कोटी खर्च आला असून हा पुणे येथील नामांकित मे. एक्टिव इंजीनियरिंग सर्विसेस यांनी कार्यान्वित केलेले आहे. यावेळी जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे व्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, ए.एस.स्वामी, पी.एम.आडनाईक, डी.
Leave a Reply