
कोल्हापूर/प्रतिनिधी : सुयश एंटरटेनमेंट व समीक्षा म्युजिक संजय चौगुले,रावसाहेब वंदुरे निर्मित निशिकांत महाबळ (मालक) प्रस्तुत मराठी चित्रपट रंग अबोली हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आज शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी , कोल्हापूरमध्ये शाहू टॉकीज,दुपारी १२ वा.अलका सिनेमा पुणे दुपारी १२वा., व वैभव सिनेमा हडपसर दुपारी ३ वाजता व सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त प्रीमिअर शो चे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा शो दिमाखात संपन्न झाला.
गिरीश परदेशी, तेजस्विनी पंडित, शरद पोंगशे, अश्विनी एकबोटे ,माधव अभ्यंकर, अंगत मस्कर, अन्वय बेंद्रे, अमोल भोसले आदी कलाकार या चित्रपटात आहेत.चित्रपटाचे निर्माता संजय चौगुले, रावसाहेब वंदुरे आहेत तर कथा /संवाद पद्मनाथ पवार असून दिग्दर्शक नितीन भास्कर यांनी केले आहे तर छायाचित्र समीर भास्कर यांनी केले संगीत चंद्रकांत कागले, गायक कलाकार मिलिंद इंगळे असून संकलन स्मिता फडके यांनी केले आहे.आणि कार्यकारी निर्माता प्रवीण वानखडे, दुष्यंत इनामदार आहेत.तर
कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी केले आहे.तरी हा चित्रपट प्रेक्षकानी आवर्जून पहावा असे आवाहन
केले आहे.
Leave a Reply