टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत सिम्बॉलीकच्या विद्यार्थ्यांचे यश

 

कोल्हापूर : मुंबई आयआयटी येथे झालेल्या टेक फेस्ट रोबोटिक्स स्पर्धेत शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

एशिया लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले होते. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा मिलाफ असलेल्या या रोबोटिक्स स्पर्धेत स्कूलच्या १९ विद्यार्थ्याची निवड झाली. या स्पर्धेत रोको रोबोसॉकर या प्रकारात संकल्प पाटील यांने तीन गोल करत प्रथम क्रमांक मिळवला. तर कॉझ्मो क्लेच प्रकारात चैतन्य तिरपणे यांने व रोबो रेस प्रकारात स्वदीप काटकर यांने तृतीय क्रमांक मिळवला. आर्यन पवार, मयुरेश काटे, स्वराज तानवडे, मयंक पटेल, अरहम शेख, गौतम पटेल, योगीराज पाटील, प्रणव पाटील, धैर्यशील पाटील, श्रीशैल गुरव, गंधर्व साळुंखे, आरुष शेलार, तन्मय भोसले, मयुरेश शिपेकर, चैतन्य तिरपणे, संकल्प पाटील, स्वदीप काटकर, आर्या मुखरे, जानवी कुंभार यांनी ही स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केली. विद्यार्थ्यांना संस्थापिका गीता पाटील, संस्थाध्यक्ष गणपतराव पाटील यांचे प्रोत्साहन, प्रशासकीय अधिकारी म्रिणाल पाटील, प्रशिक्षक सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!