
कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने येत्या गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी संवाद दिलखुलास गप्पा हा संस्मरणीय अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राजारामपुरी येथील व्ही. टी .पाटील सभागृह येथे सायंकाळी ५.१५ वाजता होत आहे अशी माहिती प्रेसिडेंट रो.कल्पना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.रोटरी क्लब ने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून येत्या २५ जानेवारी २०२४ रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या सोबत *संवाद दिलखुलास गप्पा* हा संस्मरणीय ठरेल असा कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरदसवाला यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे.डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांचे कार्य खूपच मोठे आहे.त्यांच्या या कार्याची माहिती होण्यासाठीच हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी पत्रकार परिषदेला सुजाता लोहिया, मेघना शेळके, रेणुका सप्रे, वृंदन घाटगे,बिना जनवाडकर,साधना घाटगे,अंजली मोहिते, सुरेखा इंग्रोले, सविता पेढ्ये ,दीपिका कुंभोजकर, रेश्मा शहा आदी उपस्थित होते.
Leave a Reply