
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४* हे येत्या २६ ते २९ जानेवारी २०२४ या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण राष्ट्रीय पुरस्कार विजेता हरियाणा चॅम्पियन गोलू टू १० कोटीचा रेडा* आहे.देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ,मध व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन २६ जानेवारीस दुपारी ३ वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.याचबरोबर यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,विधानसभा सदस्य विनय कोरे, मा. आमदार प्रकाश आवाडे, मा.आमदार प्रकाश आबिटकर, मा. आमदार राजेश पाटील, मा.आमदार सुरेश हाळवणकर मा. आमदार अमल महाडिक,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम,व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले आदि उपस्थित असणार आहेत.तर २९ रोजी होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत.यावेळी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ना. श्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार व संसदीय कार्यमंत्री श्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार ना.श्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री छत्रपती शाहू ग्रुप चेअरमन श्री राजे समरजीत सिंह घाटगे, महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांची उपस्थिती असणार आहे.प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.
Leave a Reply