
कोल्हापूर/ प्रतिनिधी : घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी मिळणार आहे. नवनवीन बांधकाम प्रकल्प, तंत्रज्ञान, साहित्य, सेवा, अर्थसहाय्य आणि कर्ज पुरवठा योजना यांची सर्व माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने उद्यापासून चार दिवसीय ‘दालन २०२४’ हे प्रदर्शन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात बांधकाम विषयक भरीव माहिती ग्राहकांना मिळणार आहे अशी माहिती क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी. खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बांधकामविषयक सर्व माहिती एकाच छताखाली मिळणार असून या प्रदर्शनाची तयारी पुर्ण होत आली आहे, असेही के. पी. खोत व या प्रदर्शनाचे समन्वयक, आयडियल कन्स्ट्रक्शनचे अतुल पोवार यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत.
शनिवारी दुपारी चार वाजता यशोधन कॉन्स्ट्रो लॅबचे सीईओ सुधीर हंजे युटिलाईजेशन ऑफ कन्स्ट्रक्शन अँड डिमोईलशिंग वेस्ट यावर मार्गदर्शन, डीप फेरो टेकचे संस्थापक नंदकुमार जाधव फेरो सिमेंट यावर मार्गदर्शन करतील. रविवारी दुपारी चार वाजता अभिनेत्री प्राजक्ता माळी, वैद्य सुविनय दामले ‘स्त्री शक्ती आणि आयुर्वेदाची माहिती’ यावर संवाद साधतील.प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमान, संदीप मिरजकर, अजय डोईजड, ‘दालन’चे अध्यक्ष चेतन वसा, अतुल पोवार, गणेश सावंत, श्रीधर कुलकर्णी यांनी केले आहे.
दालन’मध्ये एकूण १६० स्टॉल आहेत. त्यातील शंभरहून अधिक स्टॉल क्रिडाई सदस्य बांधकाम व्यावसायिकांचे, तर इतर स्टॉल बांधकाम साहित्य, सेवा यांचे आहेत. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील.
सोमवारी दुपारी चार वाजता महसूल, वनविभागाचे अतिरिक्त्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या हस्ते समारोप होईल. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित प्रमुख उपस्थित असतील.यंदा संधी सर्वांसाठी… यंदाचे हे १२ वे ‘दालन’ प्रदर्शन हे ब्रीद घेऊन आयोजित केले आहे. घराचे स्वप्न साकारण्याची मोठी संधी घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आहे. तरी या प्रदर्शनास भेट द्यावी,असे आवाहन अध्यक्ष के. पी. खोत व ‘दालन’ चे अध्यक्ष चेतन वसा यांनी केले आहे.
Leave a Reply