डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

 

कोल्हापूर:आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नॅनो पदार्थाची वाढती मागणी व बायोसेन्सरच्या प्रभावी वापरामुळे येणाऱ्या काळामध्ये अन्न व रसायन उद्योगामध्ये विद्यार्थांना भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. दक्षिण कोरियामध्ये उच्च शिक्षणासाठी नॅनोतंत्रज्ञान विषयात शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. याकरिता विद्यार्थांनी चांगले संशोधन करून उत्कृष्ट शोधनिबंध प्रसिद्ध करावेत असे प्रतिपादन दक्षिण कोरियाच्या चँगअँग विद्यापीठाचे प्रा. डॉ.जॉन्ग पिल पार्क यांनी केले.

तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ” नॅनोतंत्रज्ञान व बायोसेन्सरचा अन्न व रसायन उद्योगात होणारा वापर ” यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पार्क बोलत होते. प्रा. पार्क हे डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ मध्ये ऍडजन्ट प्रोफेसर म्हणून अन्न तंत्रज्ञान विभागासाठी कार्यरत आहेत. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. नवनाथ पडळकर, कुलगुरू प्रा.डॉ के.प्रथापन, कुलसचिव प्रा.डॉ.जे.ए.खोत, अन्न तंत्रज्ञान विभागाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ के.प्रथापन म्हणाले ” संशोधनाकरिता भविष्यात दक्षिण कोरिया येथे विद्यार्थी पाठवण्याचे नियोजन आहे. विद्यार्थांकडून परदेशी शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या जीआरई आणि टोफेल सारख्या स्पर्धामक परीक्षाची तयारी करून घेऊ. चँग अँग विद्यापीठासोबत एकत्रित संशोधन प्रकल्प राबववण्यासाठीही विद्यापीठाकडून प्रयत्न केला जाईल ”प्रास्ताविकात डॉ.विक्रमसिंह इंगळे यांनी चर्चासत्राचा उद्देश व महत्व विशद केले. चर्चासत्र आयोजित करण्यासाठी डॉ संदीप वाटेगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी असोसिएट डीन डॉ.गुरुनाथ मोटे व डॉ.विक्रमसिंह इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.या चर्चासत्रासाठी २०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पाहुण्याची ओळख डॉ. गुरुनाथ मोटे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.विश्वजीत पाटील व कु.सौम्या झा यांनी केले तर आभार डॉ. तानाजी भोसले यांनी मानले.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू प्रा.डॉ.के.प्रथापन व कुलसचिव प्रा.डॉ. जे.ए. खोत यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!