
पुणे : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत ‘गोकुळ शक्ती’ या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा पुणे विभागातील विक्री व वितरण शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या शुभहस्ते व जुन्नरचे आमदार अतुल बेनके व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला.
आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील म्हणाले, गोकुळने नेहमीच गुणवत्तेच्या जोरावरती अनेक उद्दिष्ट पार केली आहेत. सन १९९९ पासून गोकुळने पुणे येथे दूध विक्रीस प्रारंभ केला. गोकुळने गुणवत्तेमध्ये सातत्य ठेऊन पुणे येथील ग्राहकांची विश्वासाहर्ता जपली आहे. ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यास गोकुळ नेहमीच कटीबद्ध आहे. गोकुळच्या दुधाची व उपपदार्थांच्या विक्रीमध्ये पुणे व पुणे परिसरातील वितरक यांच्या सहकार्यामुळे व त्यांच्या मेहनतीमुळे वाढ झाली आहे, भविष्यात ही वाढ अधिक व्हावी यासाठी वितरकांनी प्रयत्न करावेत व हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढवावा तसेच गोकुळचे नवीन प्रतीचे ‘गोकुळ शक्ती’ दूध हे निश्चित पुणे येथील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल व बाजारपेठेमध्ये नाव करेल. संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, पुणे व नजीकच्या जिल्ह्यातील ग्राहक व वितरकांकडून देखील मुंबई प्रमाणेच पुणे येथे ‘गोकुळ शक्ती’ दूधाची उपलब्धता करून द्यावी अशी विचारणा केली जात होती. ग्राहक व वितरकांची होणारी मागणी लक्षात घेऊन पुणे व नजीकच्या जिल्ह्यात वितरणासाठी टोण्ड दूध ‘गोकुळ शक्ती’ या नावाने वितरीत करण्याचा निर्णय गोकुळच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. सदरचे टोण्ड दूध हे पाश्चराईज्ड, होमोजिनाईज्ड बरोबरच व्हिटॅमीन ‘अे’ व ‘डी’ ने फोर्टीफाईल केले असलेने याचे शेल्फ लाईफ वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे. सध्या गोकुळची दररोज १४ लाख लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते.गोकुळ शक्ती’ या टोण्ड दूधाची गुणवत्ता फॅट ४.१ व एस.एन.एफ. ९.२ असून मार्केटमध्ये दुधाची विक्री किंमत प्रतिलिटर रुपये ५६ इतकी ठेवण्यात आली आहे. हे टोण्ड दूध १ लिटर व ५ लिटरचे पाऊचमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. तो अर्धा लिटर पॅकिंगमध्ये ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध उपलब्ध करून देण्याचा संघाचा मानस आहे. निश्चितच स्पेशल होमोजिनाईज्ड व बॅक्टोफ्युज केलेले ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. तरी पुणे शहर व नजीकच्या जिल्ह्यातील विशेष करून चहाचे स्टॅाल्स धारक, हॉटेल व्यवसायिक व ग्राहकांनी या टोण्ड दुधाचा लाभ घ्यावा असे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आवाहन केले.
Leave a Reply