गोकुळमुळे दूध उत्पादकांचाआर्थिक उत्कर्ष : प्रशांत मोहोड

 

कोल्हापूर : राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास गुरुवारी सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्‍यात आला.

प्रशांत मोहोड म्हणाले, गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील आग्रगण्य संस्था असून गोकुळने आपल्या गुणवतेच्या व उत्कृष्ट व्यवस्थापनेच्या जोरावरती मोठी भरारी घेतली आहे. दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कार्षामध्ये गोकुळचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी केले. जिल्हा दूध संघाच्या गोकुळ शिरगाव ता.करवीर येथील मुख्य प्रकल्पास नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी शासनामार्फत गाय दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये गोकुळ दूध संघ आघाडीवर असून त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. या योजनेतील काही त्रांतिक अडचणी व त्रुटी आहेत त्या दुरुस्ती करून जास्तीत जास्त गाय दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासंबंधी यावेळी चर्चा करण्यात आली.

    यावेळी गोकुळचे अधिकारी एम.पी.पाटील यांना एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल तसेच गोकुळचे कर्मचारी तुषार चोथे लिंगनूर शीतकरण केंद्रकडील रेफ्रिजरेशन विभागातील उल्लेखनिय कामगीरी केलेबद्दल राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, राजेंद्र मोरे, संचालिका अंजना रेडेकर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटी, सहा.निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,नामदेव दवडते व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!