‘गोकुळ’ मार्फत गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम

 

कोल्‍हापूर:कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, कोल्‍हापूर (गोकुळ) मार्फत जिल्‍ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम चालू करण्‍यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण करून घेणेत यावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी मौजे चांदेकरवाडी ता. राधानगरी येथे या मोहीमेच्या उद्‌घाटन प्रसंगी केले, यावेळी संघाचे अधिकारी, गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते. चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरीया (गोचिड ताप) हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे, या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो परिणामी अशी जनावरे कायम स्‍वरूपी निकामी होतात अथवा त्‍यांच्‍या दूध उत्‍पादन व प्रजनन शक्‍तीवर मोठा परिणाम होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळने गोचिड निर्मुलन व थायलेरीया लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी थायलेरीया लस संघाने मोफत उपलब्‍ध केली असून दूध उत्पादकांनी आपला गोठा, गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचिड निर्मुलन व लसीकरण करून घेणेत यावे. तसेच संघाच्या सर्व पशुवैद्यकीय सेवासुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दूध उत्पादन वाढीस सहकार्य करावे. ही मोहीम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोकुळ संलग्न सर्व गावामध्ये राबविण्यात येणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोचिड निर्मुलन व थायलेरीया लसीकरणाचे व औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.लालबहादूर दूध संस्थेचे चेअरमन वाय.सी.खोत, यशोधा महिला दूध संस्थेच्या चेअरमन सौ.मनिषा पताडे, भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.यु.व्‍ही.मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगळे, संदीप ढेकळे, एल.के.खोत,अशोक खोत, द.ग.पताडे, युवराज सुतार,आर.डी.खोत, यशवंत खोत. शोभा खोत तसेच गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!