शिवसेना युवा सेनेच्या वतीने कर्तुत्ववान महिला भगिनींचा सन्मान उपक्रमास सुरवात

 

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्ष सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना,महिला आघाडी आणि युवासेना, युवतीसेनेच्यावतीने कोल्हापुरातील कर्तुत्वान महिला माता-भगिनींचा सन्मान करण्यात येणार असून आज जागतिक महिला दिनानिमित्त याची सुरुवात करण्यात आली.

शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
यामध्ये तनिषा सुधीर बेडेकर,हर्षली सुशील बेडेकर, सुप्रिया शिंदे, अभया कुलकर्णी, शुभांगी घराळे, विद्या गतारे, दिपाली कतगर, अमृता कोळेकर आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाचा हा सोहळा पुढील काही दिवस सुरू राहणार असून, शहरातील विविध भागातील महिलांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी सत्कारमूर्ती महिलांसह शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळतकर, गीता भंडारी, शारदा भोपळे, युवतीसेना शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले, शहरप्रमुख सौ. तेजस्विनी घाटगे सरचिटणीस दर्शना मंडलिक,समन्वयक श्रुती लाड,उपशहरप्रमुख निवेदिता तोरस्कर वल्लरी वाले,मेघा दत्तात्रय पाटील, साक्षी रांगणेकर, दीक्षा पवार, सायली प्रभावळकर, तन्वी जाधव, युवासेनेचे मंदार पाटील, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, विपुल भंडारी, सौरभ कुलकर्णी, मंगेश चितारे, विनायक मंडलिक, रोहन शिंदे, अवधूत घाटगे, अवधेश करंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!