
कोल्हापूर : भारतीय संरक्षण दलातील पहिल्या स्वदेशी लढाऊ रणगाड्याचे इंजिन तयार करण्यात यश आले असून त्यातील महत्त्वाचा पार्ट ‘कॅमशाफ्ट’ चे उत्पादन कोल्हापूरच्या ‘रवि कॅम’मध्ये झाल्याची माहिती उद्योजक रवि मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.उद्यमनगर, कोल्हापूर हे भारत केंम इंडस्ट्रीज नावाने सुरू झालेली इंजिन कॅमशाफ्टची निर्मिती करणाऱ्या लघुउद्योगाचे रूपांतर रवि कॅम
मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झाले आहे. कॅमशाफ्टची निर्मिती करणारी ही कंपनी असून नाशिकच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या सहकार्याने कॅमशाफ्ट तयार केले. ते वापरलेल्या इंजिनची म्हैसूर येथे यशस्वी चाचणी झाली असून समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर, उणे शून्य तापमानात व वाळवंटातील वातावरणात या इंजिनच्या कार्यक्षमतेची तपासणी सुरू आहे. या इंजिनसाठी लागणारे सिलिंडर हेड कोल्हापुरातीलच सरोज आयर्स यांनी तयार केले आहे.
म्हैसूर संकुल येथे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शंतनू राय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या हस्ते कंपनीचा गौरव करण्यात आल्याचे रवि मुळीक यांनी सांगितले यावेळी, सागर मुळीक, धनुक संकरण डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply