डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ ‘अन्वेषण’ स्पर्धेत तृतीय

 

कोल्हापूर: भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सवात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनी लीना राजेंद्र चौधरी यांनी तृतीय स्थान मिळवले.देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी मिळवून देणे, संशोधनवृत्तीला बळ देणे या उद्देशाने या संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा वर्गातून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्यावतीने कु. लिना राजेंद्र चौधरी यांनी ‘अन्वेषण’मध्ये सहभागी होऊन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान श्रेणीमध्ये ‘टिश्यू इंजिनियर इअर पिंना’ या विषयावरील सादारीकरण केले. विद्यापीठाच्या स्टेम सेल आणि रीजनरेटिव्ह मेडिसिन आणि मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मेघनाद जोशी यांचा मार्गदर्शनाखाली कानाची विकृती किंवा दुखापत दुरुस्त करण्यासाठी 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम कान विकसित करण्याचा प्रकल्प संशोधनात सादर करण्यात आला. या संशोधनासाठी लिना चौधरी याना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. भारतीय विद्यापीठ संघाचे संयुक्त सचिव (संशोधन) डॉ. अमरेंद्र पानी यांचा हस्ते २५ हजार रूपयांचे पारितोषिक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन चौधरी याचा गौरव करण्यात आला.या संशोधनासाठी रिसर्च डिरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!