
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज आज कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जनतेच्या मोठ्या प्रतिसादात रॅलीद्वारे दाखल करण्यात आला. रॅलीला झालेली प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाची साक्ष देत होता.
यावेळी संभाजीराजे छत्रपती, आमदार पी.एन.पाटील, सरोज (माई) पाटील, मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, संजयबाबा घाटगे, विजय देवणे, संजय पवार, व्ही.बी. पाटील, ए.वाय. पाटील, आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, नंदाताई बाभूळकर, सुनील शिंत्रे, आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, डी. जी. भास्कर आदी उपस्थित होते.
Leave a Reply