
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात भारताचा सर्वांगीण विकास केला. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतोय ही भावना मनी ठेवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. भारत देशाचे स्थान जगात अव्वल आणि अग्रेसर होण्यासाठी श्री. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया, असेही ते म्हणाले.
गडहिंग्लजमध्ये महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित गडहिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना -शिंदे गट व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. मुश्रीफ बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारत देश विकासाच्या दिशेने नेला.
Leave a Reply