
कोल्हापूर/प्रतिनिधी: हॉटेल टुरिस्ट जवळ असणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरातील दोशी ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये व्हॅलीस या कृत्रिम सांध्याच्या हायटेक रोबोद्वारे गुडघे प्रत्यारोपण सुविधा आता उपलब्ध झाली आहे.या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकतेने रुग्णांचे आयुर्मान व जीवन चांगले होण्यास मदत होणार आहे. हॉस्पिटलचे मुख्य अस्थिरोग तज्ञ डॉ. किरण दोशी यांनी याबद्दल माहिती दिली.
गेले ३५ वर्षाहून अधिक काळ अस्थिरोगातील नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार दोशी ऑपिडिक अँड इंडोक्राइन सेंटर येथे अविरतपणे देण्यात येत आहेत. एकंदरीत जीवनशैलीतील बदलासह विविध कारणांमुळे गुडघेदुखींचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये बऱ्याच रुग्णांना गुडघेरोपण उपचार पद्धतीमुळे व्याधीमुक्त जीवन जगता येईल.
व्हॅलीस रोबोटच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे CT स्कॅनशिवाय संपूर्ण शास्त्रक्रिया करता येणे शक्य आहे. प्रक्रियेच्या शेवटी डॉक्टरांना नव्या गुडघ्याची स्थिरता हालचाल व रचना याचे शस्त्रक्रिया चालू असताना अधिक निरीक्षण करता येते. संपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सक रोबोटचे नियंत्रण करतो. उपकरण स्वतःहून शस्त्रक्रिया करू किंवा हलू शकत नाही.
याचे रुग्णांसाठी होणारी फायदे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेची अचूकता वाढविता येते व पायाचा अचूक तोल साधता येतो. शस्त्रक्रिया चालू असताना संगणक प्रत्येक पायरीला सूचना देत असतो. त्यामुळे कृत्रिम सांध्याची जागा पायाचा कोन व अस्थिसंबंधीची सुसूत्रता यातील अचूकता वाढते. या सर्वांचा फायदा सांधा जास्त काळ टिकण्यासाठी होतो.
तसेच संसर्गाची शक्यता अतिशय कमी, अधिक गुणशाली जीवनशैली, कमीत कमी हॉस्पिटलमधील वास्तव्य, कमीत कमी औषधांचा वापर असे अनेक फायदे यासह बदललेल्या सांध्याचे व रुग्णांचे आयुर्मान अधिक चांगले होण्यास मदत होते.
यामुळे कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. तसेच वैद्यकीय पर्यटनास चालना मिळणार आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांवर या रोबोटिक पद्धतीने गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून अगदी एका दिवसात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन ते आपल्या घरी जाऊ शकतात. आणि आपले नेहमीच आयुष्य जगू शकतात. प्रत्यारोपणानंतर कोणताही त्रास त्यांना उद्भवला नाही असे हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस डॉ. सौ.भारती दोशी, डॉ. रिशी दोशी, डॉ. सौ. निकिता दोशी,डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.
Leave a Reply