
कोल्हापूर : कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे या भागातील शेती सुजलाम-सुफलाम झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी शुगर मिलची उभारणी केल्याने कसबा बावड्याचे जीवनमान उंचावले. न्यू पॅलेसमुळे शाहू छत्रपती यांचे ऋणानुबंध बावडेकरांशी कायम राहिले आहेत. शाहू छत्रपतीवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी लोकसभेच्या माध्यमातून मिळाली असून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा बहुमान कसबा बावडेकरच मिळवतील, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.कसबा बावडा परिसरातील कवडे गल्ली ते हनुमान मंदिर आणि परिसरातील २० पेक्षा अधिक गल्ल्या आणि अनेक वसाहतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. त्यात दीड हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रत्येक गल्लीबोळात नागरिकांकडून नेत्यांचे स्वागत तसेच महिला वर्गाकडून औक्षण केले जात होते. हलगी, घुमकीच्या ताल प्रचारफेरीत रंग भरत होता. इंडिया आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त आणि एकजुटीने सहभाग या प्रचारफेरीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींच्या विजयासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन तयार असून चार जून रोजी मतमोजणीवेळी कसबा बावडावासियांचा चमत्कार लोकांना दिसेल.मालोजीराजे म्हणाले, पदयात्रेत लोकांचा आणि घटक पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग हा शाहू छत्रपतींचा लोकसभा निवडणुकीतील विजय किती विक्रमी असेल, याचे प्रत्यंतर आणून देणारा आहे.पदयात्रेत माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार, श्रावण फडतारे, अजित पोवार-धामोडकर, श्रीराम सोसायटीचे चेअरमन उमाजी उलपे, व्हाइस चेअरमन दत्तात्रय मासाळ, संचालक अनंत पाटील, रमेश रणदिवे, युवराज उलपे, सुभाष गरगडे, राजू चव्हाण, धनाजी गोडसे, हिंदूराव ठोंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील, सागर यवलुजे, संजय लाड, सुरेश उलपे, दिनकर उलपे, बहुजन वंचित आघाडीचे अविनाश कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे राहुल माळी, अक्षय खोत, उत्तम घोरपडे, नारायण गायकवाड, विनायक घोरपडे, उमेश सावंत, गुरुदास ठोंबरे, उदय जाधव, विष्णू पोवार, बामसेफचे महेश बावडेकर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, लक्ष्मण करपे, विनायक बोनगे, दयानंद गुरव, मंदार पाटील यांनी केले.
Leave a Reply