वीर कक्‍कय समाजाचा शाहू छत्रपतींना एकमुखी पाठिंबा

 

कोल्हापूर : चामडे कमावून उदरनिर्वाह करणार्‍या कक्‍कय समाजाला राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पंचवीस रूपये नजराण्याच्या बदल्यात जागा देऊन त्यांचे बिंदु चौकातून जवाहरनगर परिसरात पुनर्वसन केले. त्यांचे ऋण आम्ही आजन्म फेडू शकत नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणार्‍या शाहू छत्रपतीना वीर कक्‍कय समाजाचा एकमुखी पाठिंबा राहील, अशी घोषणा कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ यांनी येथे बोलताना केली. दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांप्रमाणेच सध्याच्या शाहू छत्रपतींनी समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून एकोपा जपला आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले.आ. ऋतुराज पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींनी सर्वसामान्य घरातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध व्हावे, म्हणून अगदी माफक शुल्कामध्ये शाहू विद्यालय सुरू केले. या विद्यालयामुळे गरीब मुलांनाही शिक्षणाची कवाड़े खुली झाली. शिवाय शैक्षणिक, क्रीड़ा, सांस्कृतिक क्षेत्रात शाहू छत्रपतींनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीमधून त्यांनी जपले आहेत. खर्‍या अर्थाने ते कोल्हापूरचे पालक आहेत. त्यांना पालक म्हणूनच लोकसभेत आपण पाठवायचे आहे.आमदार सतेज पाटील म्हणाले, आमच्या प्रचार यंत्रणा राबवत असलेल्या कार्यकर्त्यांवर दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्याशी गाठ आहे, कोणी असा प्रयत्न केल्यास मला सांगा मी तातडीने तेथे हजर होईन.महागाई गगनाला भिडली आहे. विरोधक प्रचार करायला दारात आले की महिला भगिनींनी गॅस सिलेंडर दारात आणून ठेवावे. मग विरोधक समजून जातील. पुढचे चौदा दिवस कार्यकर्त्यांनी खडा पहारा देऊन प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शाहू महाराज म्हणाले, वायफळ बोलण्यापेक्षा कृतीवर आपला भर राहील. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण या मुद्यावर आपण निवडणूक लढवत आहोत.
सभेचे प्रमुख संयोजक माजी नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले, थेट पाइपलाइन उद्दिष्टपूर्तीनंतर आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरुन मिरवणूक काढायची होती.शाहू छत्रपतींच्या विजयानंतर सतेज पाटील आणि शाहू छत्रपतींची हत्तीवरुन एकत्रित मिरवणूक काढली जाईल.यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या सरलाताई पाटील, सोशलिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी हसन देसाई, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप देसाई, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, प्राचार्य टी. एस. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निरंजन कदम, माजी नगरसेवक नियाज खान, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, जनता दलाचे रवी जाधव आदिंची भाषणे झाली. वीर कक्‍कय समाज आणि सुभाषनगर वसाहतीतील नागरिकांच्या वतीने शाहू छत्रपतींना या प्रचारसभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी माजी महापौर जयश्री सोनवणे, मनीषा बुचडे, शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी नगरसेविका भारती पोवार, प्रा. अनिल घाटगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सुनील देसाई, माजी नगरसेविका पद्मा तिवले, माजी नगरसेवक माणिक मंडलिक, आम आदमी पक्षाचे सूरज तिवले, प्रसन्‍न वैद्य, राजेश व्हटकर, शादाब अत्तार, सलीम मुजावर, हाजी अब्दुलसत्तार शेख, सुरेश वाईकर, किरण मोरे, विजय पाटील, अरुण सोनवणे, संदीप बिरंजे, लाल निशाण पक्षाचे प्रकाश जाधव, राजेश व्हटकर, किरण व्हटकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!