अब की बार… चारशे पार… कोल्हापूरात पुन्हा नमो नमो

 

कोल्हापूर:कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य-दिव्य महविजय संकल्प सभा कोल्हापूर येथे संपन्न झाली. युवकांना संधी देणारे, महिलांना सशक्त करणारं, समाजातील वंचित घटकाला न्याय देणारे असं सामान्य जनतेचे सरकार पुन्हा एकदा निवडून द्या, त्यासाठी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन यावेळी मोदी यांनी प्रचंड संख्येने उपस्थित नागरिकांना केले.यावेळी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी बलशाली, सशक्त, सुरक्षित, विकसित आणि विश्वगुरू भारत घडविला. यासाठी त्यांनी युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांची उन्नत्ती साध्य केली. कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी सातारा कागल रस्त्यासाठी 3500 कोटी रुपये, संकेश्वर-बांधा – 2200 कोटी, कोल्हापूर रत्नागिरी – 2000 कोटी, कोल्हापूर रेल्वे स्टेशन – 45 कोटी, कोल्हापूर विमानतळ – 274 कोटी, कोल्हापूरच्या जलजीवन मिशनसाठी 1345 कोटी रुपये, कोल्हापूरच्या इ बसेससाठी 142 कोटी रुपये असा भरभरून निधी दिला आहे. जगातील सर्वोत्तम ते सर्व भारतात आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. अशा सशक्त नेतृत्वाला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करूया. असे आवाहन खासदर धनंजय महाडीक यांनी यावेळी केले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनुक्रमे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज विराट जनसभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ४०० खासदारांमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेचे दोन खासदार असावेत, असे आवाहन कोल्हापूरकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार आहे. राज्याचे हे मोठे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटतेय, हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरत असून उबाठाची १०० टक्के काँग्रेस झालीय, असे मत यासमयी व्यक्त केले. उबाठा परिवार काँगेसला मतदान करणार हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील, अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झालाय. आईच्या निधनाचे दु:ख विसरुन निस्वार्थ सेवा करणारा पंतप्रधान देशाला हवाय. मोदीजींकडे नुसते आश्वासनांचे पेढे नाहीत तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे. ‘येड पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी राहुल गांधींची अवस्था झाली आहे. देशात मोदीजींची गॅरंटी चालते. त्यामुळे मोदी गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही, असे निक्षून सांगितले.यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य कोल्हापूरकर नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!