
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात शिवशाहू निर्धार सभा प्रचंड गर्दी आणि उत्साहात पार पडली. माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंह, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार चंद्रकांत हंडोरे यांची या सभेस प्रमुख उपस्थिती होती.
शिवशाहू निर्धार सभेला झालेली प्रचंड गर्दी, उपस्थितांचा प्रतिसाद श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा विक्रमी मताधिक्याने विजय निश्चित असल्याची खात्री देत होता.
यावेळी आमदार जयश्री जाधव,आमदार पी एन पाटील, युवराज संभाजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर जयंत पाटील,यांच्यासह शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार सुरेश साळोखे, गोपाळराव पाटील, नंदाताई बाभूळकर, स्वाती कोरी, अप्पी पाटील, ए.वाय.पाटील, डॉ. चेतन नरके, भारत पाटणकर यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply