
कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (सरुडकर) यांच्या प्रचार सभेचे पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सत्यजित पाटील (सरुडकर) यांना विजयी करा, असे आवाहन केले. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार राजूबाबा आवळे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिणचेकर, विद्या पोळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते.
Leave a Reply