
कोल्हापूर : कसबा बावडा येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व मविआ चे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शाहू छत्रपती महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या सभेत उपस्थित नागरिकांना केले. या सभेस आमदार विश्र्वजीत कदम, मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सुनील मोदी, भारतीताई पोवार, सचिन चव्हाण, हर्षल सुर्वे, उत्तम पाटील, सतिशचंद्र कांबळे, दिनकर उलपे, राहूल माळी, प्रशांत पाटील, हरिष चौगले, जयसिंग ठाणेकर, वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, डॉ. संदिप नेजदार, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, उमाजी उलपे, दत्तात्रय मासाळ, विलास दाभोळकर यांच्यासह माजी नगरसेवक, इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply