आयर्विन ख्रिश्चन मैदानावर मनोरंजन नगरीत अवतरला पाण्याखालील माशांचा बोगदा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आयर्विन ख्रिश्चन मैदानावर पाण्या खालील माशांचा बोगदा म्हणजेच अंडरवॉटर टनेल एक्स्पो लोकांसाठी उपलब्ध झाला आहे. माशांच्या विविध जाती येथे पहायला मिळतील.तसेच आणि लहान मोठया सर्व लोकांना याठिकाणी धमाल मस्ती आणि त्यांचे मनोरंजन होणार आहे.रेड गोल्ड फिश,ऑस्कर, सिल्व्हर गोल्ड, ब्लॅक गोल्ड, फिराना, टँटरा,लेझर, शार्क,कोईकर, अँलीगेटर, आरफामा आदी माशांच्या प्रजाती याठिकाणी पाहण्यास मिळत आहेत.अशी माहिती एक्सपोचे मॅनेजर जयराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

केरळ येथील तज्ञ या सर्व माशांची काळजी घेतात.येथे उभा करण्यात आलेला माशांचा बोगदा साधारण ८० फूट रुंद व २०० फूट लांब आहे. सर्वांच्याच मनोरंजनासाठी विविध आकर्षक खेळ आणि खाद्य पेय यांची दुकाने आहेत. खरेदीसाठी विविध दुकाने असून मनोरंजन नगरीचा आनंद घेऊ शकतो. परदेशी खेळ यात मेरी गो राउंड, फिरता मनोरा, लहान मुलांची आगगाडी, लहान मुलांसाठीचे पाळणे, जपानी पाळणा त्यालाच ‘त्सुनामी पाळणा’ असे सुद्धा म्हणतात. या सर्व मनोरंजनांची वेळ सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत आहे.तरी कोल्हापूरकरांनी या मनोरंजन नगरीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पहिल्यांदाचं वातानुकूलित पाण्याखालील बोगद्यामध्ये मासे बसवण्यात आले आहेत.दुबईचा फिल कोल्हापूरच्या मातीत दिसून येत आहे.
कडक उन्हाळा सुरू असून शाळेला सुटी लागली आहे. या सुट्टीत कोल्हापूरच्या बाळगोपाळासाठी आयर्विन ख्रिश्चन मैदानावर पाण्याखालचा बोगदा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी धमाल मज्जा आणि आनंद घेता येणार आहे. पाच वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. तेथे गेल्यानंतर कोल्हापूरात नाही तर दुबईत आहे असे वाटते.संपूर्ण जगातील विविध प्रकारच्या जिवंत माशांचे प्रदर्शन कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच सुरू केले आहे. हे सर्व मासे काचेच्या मोठ्या अँक्वेरीमध्ये आहेत. २४ तास माशांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो.उन्हाळ्यात सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी बागा, मैदाने अपुरी पडतात. ऊन खाली झाल्यानंतर या मुलांना कधी आम्ही खेळणार असे वाटत असते.म्हणूनच कोल्हापूरच्या मातीत मुलांच्या भेटीला आयर्विन ख्रिश्चन मैदानात एक्स्पो आला आहे.तरी ३ जून पर्यंत सुरू राहणाऱ्या या अंडर वॉटर टनेल एक्सपोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी राहुल इस्लाम, शाहिद बारगीर, एजेस पटेल, महेश चक्रवर्ती, गजानन मोठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!