
कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) मान्यता प्राप्त येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी चौगुले या विद्यार्थिनीने 96 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. स्कूल मधील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 90% च्या वर पाच विद्यार्थी आहेत. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): आयुषी चौगुले (९६%), अक्षया शिराळे, आबीद शेख (९४%), स्वरूप कोरगावे, नितीन रजपूत (९१%). विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, मुख्याध्यापक प्रशांत काटकर यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष गणपतराव पाटील व प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
Leave a Reply