‘गोकुळ’ दूध संघ सहकाराचा मानदंड :खासदार विशाल पाटील

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.खासदार विशाल पाटील म्हणाले, देशाच्या कृषी क्षेत्रास दिशा देण्याचे काम सहकाराने केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान असून गोकुळने सहकारातील मूल्यांची जपणूक करत दुग्ध व्यवसायातील दूध संकलन, दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला एकूणच नाव लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा गोकुळ दूध संघ हा सहकाराचा मानदंड आहे. गोकुळसारख्या शेतकरी भिमुख असणाऱ्या संस्थेस भेट देण्याचा योग आला. गोकुळ परिवाराच्या वतीने माझा सन्मान केलेबद्दल आभार मानले व भविष्यात दुग्ध व्यवसाया संबंधी असणाऱ्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी केंद्रामध्ये पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.यावेळी चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्‍या माध्यमातून आज लाखो दूध उत्पादक शेतकरी सक्षम झाले आहेत. अशा या थोर व्यक्तींचे वारस असणारे सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार गोकुळ मध्ये करणे हे आमच्यासाठी आनंदाचे आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी दुग्ध व्यवसायातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रयत सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे, शिवसेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील,संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, डी.डी.पाटील, संघाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!